एसबीआयची चालू आर्थिक वर्षात दुसऱयांदा कपात
मुंबई
: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील दिग्गज भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) बचत खात्यावरील व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वार्षिक व्याजदर 0.05 टक्क्मयांनी कमी करुन 2.70 टक्के करण्यात आल्याचे एसबीआयने सांगितले आहे तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आयसीआयसीआयनेही बचत खात्यावरील व्याजदर 0.25 टक्क्मयांनी कमी केला आहे. हा बदल संबंधीत व्याजदरावर 31 मेपासून लागू करण्यात आला असल्याचे बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे सांगितले आहे.
चालू आर्थिक वर्षात एसबीआयने दुसऱयांदा बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. यामध्ये एप्रिलमध्ये बँकेने सर्व स्लॅबमधील बचत खात्यांचा व्याजदर 0.25 टक्क्मयांनी कमी करुन 2.75 टक्के केला आहे. यासोबतच आयसीआयसीआय बँकेने 50 लाखापेक्षा कमी रक्कमेवर व्याजदर 0.25 टक्क्मयांनी कमी करुन तो 3.25 वरून 3 टक्के केला आहे.









