मे महिन्यातील आकडेवारी : सोने बाजारात शांतता
नवी दिल्ली
: मागील काही महिन्यांपासून सोने आयातीचा आलेख घसरत चालला असल्याचे पहावयास मिळाले आहे. हा प्रभाव कोविडच्या संकटामुळे राहिला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. मे महिन्यातील सोने आयात तब्बल 99 टक्क्मयांनी घटली असून ती वार्षिक आकडेवारीच्या तुलनेत 1.4 टन सोने आयातीवर पोहोचली आहे. मागील वर्षातील मे महिन्यात हा आकडा 133.6 टन राहिला असल्याचे सरकारी सुत्राकडून दिलेल्या माहितीमधून सांगण्यात आले.
लॉकडाऊनमुळे देशभरातील दागिन्यांची दुकाने आणि अन्य व्यवहार बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची मागणी होत नसल्याचा परिणाम सोने आयातीवर झाला आहे. मूल्याच्या आधारे पाहिल्यास मागील वर्षातील मे मध्ये 4.78 अब्ज डॉलरची आयात घटली आहे. चालू वर्षातील मे महिन्यात 76.31 दशलक्ष डॉलरची आयात झाली आहे.
70 दिवसांनी शटर उघडले
कोरोना संसर्गामुळे देशातील सराफी बाजार मागील 70 दिवस बंद राहिला होता. त्याच्यानंतर नियम व अटीसह सराफी दुकाने पुन्हा झाली आहेत. या कालावधीत जवळपास सोने आणि चांदीच्या किमती मात्र गगनाला भिडल्याचे पहावयास मिळत आहे. हे पाहता सोने बाजार रुळावर येण्यास विलंब लागणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.









