प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे उत्कृर्ष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. याउपक्रामंतर्गत 5 व्याख्यानांचा समावेश होता. पहिल्या व्याख्यानात डॉ. अश्विनी बेळगावकर यांनी मुलांना स्वतःमधील गुण ओळखव व त्याचा सदुपयोग करा. जेथे आपण कमी पडतो त्या विषयाचा अभ्यास करा असा मौलिक सल्ला दिला.
दुसऱया सत्रात जीवन खटाव यांनी मुलांना वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती दिली. आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा तसेच प्रत्येक क्षणाचे नियोजन केल्यास चांगले काम करता येते असे त्यांनी सांगितले. तिसऱया व्याख्यानात डॉ. कमलाकर आचरेकर यांनी निकोप प्रकृती याबद्दल माहिती दिली. आपल्याला इच्छा असते परंतु आरोग्याची साथ मिळत नाही. त्यामुळे सकस आहाराचे सेवन करावे असा सल्ला त्यांनी दिला.
चौथ्या व्याख्यानात राजेश हेडा यांनी स्वतःच्या सर्वांगिन विकासाबद्दल माहिती दिले. स्वतःमध्ये बदल घडवून त्यानंतरच इतरांना सल्ला देण्यास त्यांनी सांगितले. पाचव्या सत्रात डॉ. सतिश धामणकर यांनी 12 वी नंतर असणाऱया ज्ञान शाखा याविषयी माहिती दिली. अध्यक्ष मिलिंद पाटणकर व सेपेटरी लक्ष्मीकांत नेतलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.









