प्रतिनिधी / बेळगाव
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या महिला शाखेतर्फे परंपरा संस्थेच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याबद्दल जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. बेळगाव शाखेचे अध्यक्ष अशोक बदामी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. खजिनदार विनोदिनी शर्मा यांनी ‘आईची भूमिका’ या विषयावर व्याख्यान दिले. तसेच कोविड-19 बद्दल माहिती दिली.
अनेक महिलांनी रेडक्रॉसचे सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली. महिला विभागाच्या संचालिका प्रिया पुराणिक यांनी आभार मानले. यावेळी आजीव सदस्य शामला प्रभू, सदस्या वीणा जोशी उपस्थित होत्या.









