राष्ट्रीय रस्ते सप्ताहनिमित्त आरटीओ-शिक्षण खात्यातर्फे जनजागृती
प्रतिनिधी / बेळगाव
रस्ते अपघातांमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. देशामध्ये दरवषी लाखो लोक अपघातात मृत्यू पावतात. त्यापेक्षा दुप्पट लोक गंभीर जखमी होता. तेव्हा वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळा आणि जीवन सुरक्षित करा, अशा पद्धतीने आरटीओ आणि शिक्षण खात्याच्यावतीने जनजागृती करण्यात आली.
32 वे राष्ट्रीय सुरक्षा रस्ते सप्ताहानिमित्त संयुक्त मोहिमेला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक शाळा-महाविद्यालये यामध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी आणि आरटीओचे अधिकारी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देत आहेत. विद्यार्थ्यांनी आतापासून वाहतुकीचे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण भविष्यात त्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा प्रत्येकाने वाहने चालविताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे मार्गदर्शन करण्यात आले.
सरदार्स हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सुमारे 500 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक वाय. एम. पाटील, सुनील मेत्री, आरटीओ कार्यालयातील अधिकारी शरणाप्पा हुग्गी, शहर विभागीय शिक्षण कार्यालयाचे सीआरपी भारती नरसण्णावर आदींनी या मोहिमेत भाग घेतला होता.









