ऑनलाईन टीम / हैदराबाद :
आंध्र प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हैदराबाद मधील दक्षिण भागात सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी (26 जुलै) सकाळी 5 वाजता हा भूकंप झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती. मात्र, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
यापूर्वी रविवारी पूर्व सिक्कीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती. हा भूकंप रात्री 8 वाजून 39 मिनिटांनी झाला होता.









