प्रतिनिधी /वास्को
वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत भाजपा दाबोळी महिला मोर्चाची नूतन समिती जाहीर करण्यात आली. नवेवाडे येथील संतोषी माता मंदिराच्या सभामंडपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. शितल नाईक यांनी समिती जाहीर केली. जिल्हा पंचायत सदस्य ऍड अनिता थोरात यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस रंजीता पै, खजिनदार अनिता रायकर, दाबोळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष संदीप सूद, दाबोळी महिला मोर्चाच्या नूतन अध्यक्ष व जिल्हा पंचायत सदस्य ऍड. अनिता थोरात, प्रदेश महिला मोर्चाच्या माजी सदस्य आशा मोरे, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, पंच लक्ष्मण कवळेकर, दाबोळी भाजपा मंडळाचे उपाध्यक्ष तुळशिदास पटेकर, ज्येष्ठ भाजपा कर्याकर्ते दिगंबर आमोणकर, बबन झोरे, दाबोळी महिला मोर्चाच्या सरचिटणीस निर्मला फोंडेकर, सारीका नाईक, दाबोळी महिला मोर्चाचे पदाधिकारी, सदस्य व इतर उपस्थित होते.









