नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशभरातील विविध व्यवसायांवर होत असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता याचा असर अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो आहे. 2021 आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था साडेचार टक्के इतकी आक्रसली जाणार आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे. भारतातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच काळ लागणार असल्याचेही मत आयएमएफने मांडले आहे. या साऱयाचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर निश्चितपणे होणार आहे. 2020 आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 4.2 टक्के इतकी विकसित होती. पण कोरोनामुळे 2021 आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था साडेचार टक्क्याने आक्रसली जाणार आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे.









