वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीअंतर्गत(इपीएफओ) पीएफवरील व्याजदरात आणखी घट केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
यंदाच्या मार्चमध्ये पीएफवरील व्याजदर 8.65 टक्क्यावरून 8.50 टक्के इतके करण्यात आले होते. इपीएफओकडून पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात गुंतवणूकीवरचा लाभ घटत असल्याने व्याजदरात कपात करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी इपीएफओमधील वित्तविभाग, गुंतवणूक विभाग आणि ऑडिट (लेखा) कमिटीची लवकरच एक महत्त्वाची संयुक्त बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीतच याबाबतच निर्णय होण्याची शक्यता सांगितली जात आहे. इपीएफओने 18 लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. मागच्या वर्षी मार्चपर्यंत एकूण गुंतवणूक 74 हजार 324 कोटी रुपयांची होती.









