वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. आरोग्य खात्याकडून पॉझिटिव्ह अहवालाची प्रत प्राप्त झाल्यानंतरच त्यांनी स्वतः अमेरिकन मीडियाला यासंबंधी माहिती दिली आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती उत्तम असून कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. मात्र, डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्यविषयक दक्षता घेतली जात आहे.









