जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य विषयक व्याख्यानात डॉ. सविता कद्दू यां सल्ला
बेळगाव : आजच्या स्त्राrला जीवनात एकाचवेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. कुटुंब सांभाळून नोकरी व्यवसाय करताना तिची दमछाक होते. त्यामुळे तिच्या स्वतःच्या प्रकृतीकडे तिचे दुर्लक्ष होते. याचा परिणाम स्त्राrच्या आरोग्यावर होतो. साधारण 40 45 वर्षानंतर त्यांना विविध व्याधींचा त्रास जाणवू लागतो. यासाठी आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक स्त्राrने आपल्या कुटुंबाचे रहाटगाडे हाकताना स्वतःसाठी व आपल्या तब्येतीसाठी वेळ देणे गरजेचे आहे, असा मौलिक सल्ला डॉ. सविता कद्दू यांनी दिला. त्या शुक्रवार दि. 9 रोजी काळी आमराई येथील सह्याद्री मल्टिस्टेट, मल्टिपर्पज सोसायटीच्या सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य विषयक व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. पूर्वीच्या काळी स्त्राr ही चूल व मूल यामध्येच व्यस्त असायची. आता मात्र परिस्थिती बदलली असून स्त्राrला चूल व मुलांबरोबरच नोकरी व्यवसायही सांभाळावा लागतो. यावेळी तिला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी प्रत्येक स्त्राrने आपले आरोग्य सांभाळणेही गरजेचे आहे, असे मत चेअरमन आर. बी. बांडगी यांनी मांडले. त्याचबरोबर आयएएम बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना महाजन त्यांच्या सहकारी डॉ. मंजुषा गिझरे, डॉ. राजश्री अनिगोळ यांनीही आपले आरोग्यविषयक विचार मांडले. प्रारंभी संचालिका शितल कोकीतकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संचालिका सुजाता मायानाचे, शाखा व्यवस्थापक सुरेखा सरदेसाई व सुवर्णा मोरे यांनी पाहुण्यांचे पुष्प रोपटे देऊन स्वागत केले. शुभदा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विद्या वारनुळकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला व्हा. चेअरमन प्राचार्य आनंद पाटील, संचालक सर्वश्री गोपाळराव कातकर, एस. के. कदम, किरण पाटील, विजय भोसलेसह सोसायटीच्या सर्व महिला सहकारी, ताराराणी महिला सोसायटीच्या सर्व संचालिका व सहकारी कार्यक्रमास उपस्थित होत्या.









