बेळगाव : महांतेशनगर आणि उज्ज्वलनगरच्या मध्यभागी नाला असून, वीरभद्रनगर, शिवाजीनगर अशा विविध भागातील सांडपाण्याचा निचरा या नाल्याच्या माध्यमातून होत असतो. मात्र नाल्यावरील अतिक्रमणामुळे पावसाळ्यात उज्ज्वलनगर परिसरात पाणीच पाणी होते. त्यामुळे नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. पण 10 फुटाच्या नाल्यामधून सांडपाण्याचा निचरा होणार का? व उज्ज्वलनगरची समस्या संपुष्ठात येणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उज्वलनगर परिसरातील नाल्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण बाजूला सारून नाला बांधकाम करण्यात येत आहे. वसाहत निर्माण केलेल्या परिसरात 10 फुटाच्या नाल्याचे बांधकाम केले होते. पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने उज्वलनगर परिसरात सांडपाणी साचून राहते. काहीवेळा घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरते. नाला अरूंद असल्याने शिवाजीनगर, वीरभद्रनगर, अशा विविध परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भागात पाणी साचून राहते. सध्या उज्ज्वलनगर मधील नाल्याचे बांधकाम सुरू आहे. वास्तविक पाहता शहरातील सर्व नाले 30 फुटाहून अधिक रुंदीचे आहेत. पण येथील नाल्याची रुंदी केवळ 10 फूट ठेवून शेजारील जागा रस्त्यासाठी सोडली आहे. 10 फूट रुंदीच्या नाल्यामधून शहरातील सांडपाण्याचा निचरा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाला बांधकामामुळे उज्ज्वलनगरची समस्या संपुष्टात येणार का? अशीही विचारणा होत आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा शिवाजीनगर आणि वीरभद्रनगर येथील नाल्यातून होत असतो. पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहतो. पण उज्ज्वलनगरमधील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वीरभद्र नगर परिसरात पावसाचे पाणी साचून राहते. मात्र आता उज्ज्वलनगरमधील नाला बांधकामामुळे वीरभद्रनगर आणि शिवाजीनगर मधील पावसाळ्यात उद्भवणारे पाणी साचण्याची समस्या संपणार का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
Previous Articleविविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात
Next Article परिवहनला नादुरुस्त बसचे ग्रहण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









