कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय

कंग्राळी बुद्रुक : येथील ग्रामपंचायत कार्यालय व गावच्या मध्य चौकामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर शिवमय करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी महाराज सर्व धर्मियांचे आराध्य दैवत आहेत. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन राज्य चालविले होते. शिवाजी महाराजांच्या या विचाराने आजच्या राज्यकर्त्यांनी देश चालविल्यास देशाचे नंदनवन होईल, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. य् ाावेळी ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, प्रदीप पाटील, जयराम पाटील, अनिल पावशे, दादासाहेब भद्दरगडे, तानाजी पाटील, सुरेश राठोड, मल्लेशी बुड्रेनूर, बाबू दोडमनी, नवनाथ पुजारी, उमेश पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष गजानन पाटील, सदस्या भारता पाटील, सुनिता कोळी, सुप्रिया कोळी, अर्चना पठाणे, पिराजी नाईक, सतिश पाटील आदी उपस्थित होते.
बाल तरुण युवक मंडळ, बाहेर गल्ली

बाहेर गल्ली येथील बाल तरुण युवक मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. य् ाावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील व ग्रा. पं. सदस्या सुप्रिया कोळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक धाकलू कागणकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शंकर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. य् ाावेळी बाल तरुण युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
च् ालवेनहट्टी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

च् ालवेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवमूर्ती पूजन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक बडवाण्णाचे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवरायांची आरता, प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. यावेळी लक्ष्मण बडवाण्णाचे यांनी मनोगत व्यक्त केले. य् ाावेळी नितेश नाथबुवा, अनिल पाटील, अमृत रेडेकर, भरत हुंदरे, राजू पाटील, डॉ. युवराज पाटील, मारुती पाटील, दयानंद हुंदरे, परशराम रेडेकर, आकाश पाटील, राहुल पाटील, युवराज पाटील, नागेश पाटील, मारुती पाटील, अक्षय पाटील, प्रसाद पाटील, मनोज पाटील, अतीश पाटील, किरण पाटील, राहुल रेडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले.
बेळगाव तालुका म. ए. समिती कार्यालय

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या राज्यात त्यांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यावेळेस त्यांचे राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला आदर्श ठरत आहेत. यामुळे आजही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवूनच कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे. शिवजयंती साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे विचार भागोजी पाटील यांनी मांडले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोडवरील कार्यालयात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवमूर्तो पूजन मराठा बँकेचे संचालक सुनील अष्टेकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घोषणा देण्यात आल्या. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, युवाआघाडीचे चिटणीस मोनाप्पा संताजी, दीपक पावशे, सौरवसिंह पाटील, म. ए. समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कडोलीत शिवजयंती थाटात

येथील श्री छत्रपती शिवाजी चौकात शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासमोर झालेल्या या कार्यक्रमात शिवप्रेमींनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रारंभी हभप गंगाराम लाड आणि निवृत्त शिक्षक ओ. के. चौगुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. अण्णू कटांबळे आणि वसंत पावले यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी श्री कलमेश्वर भजनी मंडळाच्या सदस्या आणि ग्रामपंचायत सदस्यांनी छत्रपती शिवरायांचा पाळणा सादर केला. त्यानंतर खानापूर येथून आलेल्या स्वाती पाटील यानी आपल्या भाषणातून शिवचरित्रावर माहिती सांगून सर्वांना उपकृत केले. यावेळी श्री कलमेश्वर भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला शिवपुतळा प्रतिष्ठापना कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शिवप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. माजी ग्रा. पं. अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू मायाण्णा यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
स्वराज युवक मंडळ, येळ्ळूर

स्वराज युवक मंडळ, कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे यांच्यावतीने शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. यावेळी स्वराज युवक मंडळाचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या व गल्लीतील नागरिक उपस्थित होते.
उचगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. उचगाव मधील प्रवेशद्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याने यावर्षी विशेष पूजा, आरती व शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या पाच वर्षांमध्ये रोज सकाळी पहाटे सहा वाजता शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र असा नित्यनेमाने कार्यक्रम सुरू असतो. प्रथम अश्वारूढ शिवरायांया मूर्तीला पुष्पहार घालून पूजन केले. नंतर पौरोहित्य चेतन कुलकर्णी यांनी मंत्रौपचारासह यथासांग पूजा केली. यावेळी ध्येयमंत्र, प्रेणामंत्र, धारकरी ,रणरागिनी, महिला व नागरिकांनी आरतीसह सादर केले. यशवंत तरळे यांनी चौथऱयाचे पूजन केले. प्रफुल्ल चौगुले यांनी श्रीफळ वाढविले. कार्यक्रमात अनेक युवकांनी सहभाग दर्शवला होता.मळेकरणी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी स्वागत केले. नेहाल जाधव यांनी आभार मानले.
खानापुरात शासकीय शिवजयंती साजरी

शासकीय शिवजयंती येथील तहसीलदार कार्यालयात औपचारिकता म्हणून साजरी करण्यात आली. तहसीलदार गोठेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, शामराव पाटील, सुरेश शिंगे, आनंदराव पाटील, हलगा ग्रा. पं. च्या अध्यक्षा सावित्री मादार यासह तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यानंतर येथील शिवस्मारक आवारातील शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले. शासकीय शिवजयंती साजरी करताना नियोजन करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येते. यासाठी सर्व राजकीय पक्षाना तसेच संघ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना शिवजयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येते. आणि शिव् जयंतीच्या कार्यक्रमासाठी विचारविनिमय करण्यात येतो. मात्र यावर्षी शिवजयंती बाबत पूर्णपणे अनास्था दिसून आली. शिवजयंतीसाठी कुणालाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. शासकीय औपचारिकता म्हणून शिवजयंतीचे सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी अनेकांनी नाराजी व संताप व्यक्त केला आहे. 2010 साली शिवजयंती शासकीय स्थरावर साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. य् ाावेळी तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी तालुक्यात शिवजयंती शासकीय स्थरावर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर मात्र फक्त औपचारिक म्हणून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यासाठी पुढील वर्षी शासकीय स्थरावर शिवजयंती मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरी करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.









