बेळगाव : भातकांडे स्पोर्ट्स अकादमी व जिल्हा वाल्मिकी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना के. आर. शेट्टी व आर्ष इलेव्हन यांच्यात शुक्रवारी सकाळी 9 वाजता खेळविण्यात येणार आहे. सरदार्स मैदानावरती अंतिम सामना के. आर. शेट्टी व आर्ष इलेव्हन संघात दरम्यान होणार आहे. के. आर. शेट्टी संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात शाम युनायटेड कोप्पळ संघाचा 8 गड्यांनी तर आर्ष संघाने मोहन मोरे बागलकोट संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना शुक्रवारी सकाळी 9 वाजता खेळविण्यात येणार असून के. आर. शेट्टी संघात रब्बानी दफेदार, नरेंद्र मांगोरे, अभिषेक देसाई, आकाश कटांबले, किरण तारळेकर, रोहीत पाटील, संतोष सुळगे पाटील, शफीक, श्ा़dरेयश मात्तीवड्डर या सारखे अष्टपैलु खेळाडू आहेत. या स्पर्धेत संतोष सुळगे-पाटील यांनी अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजी व गोलंदाजीत आपली चमक दाखवून संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेवून जाण्यास सिंहाचा वाटा उचलला आहे.
त्याला कर्णधार किरण तारळेकर, रब्बानी दफेदार व आकाश कटांबले यांनी गोलंदाजीत आपली चमक दाखविली आहे. तर फलंदाजीत नरेंद्र मांगोरे, रब्बानी दफेदार, अभिषेक देसाई, रोहीत पाटील व श्रेयश मातीवड्डर यांनी उत्तम कामगिरी झाली आहे. आर्षमध्ये गौस शेख, अनुप, वाहीद अब्दुल, कृष्णा चांदेकर, कुलदीप नाईक, इम्रान आणि डॉमनिक फर्नांडीस या सारखे अष्टपैलु खेळाडू असल्याने के. आर. शेट्टी संघाला कडवी लढत देण्याची ताकद या संघाकडे आहे. डावखुरा गोलंदाज कृष्णा चांदेकर व कुलदीप नाईक यांनी अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर गारद केले आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागून आहे. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हापालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. सतीश जारकीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी, भातकांडे स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे व वाल्मिकी समाजाचे राजशेखर तलवार हे उपस्थित राहणार आहेत.









