बेळगाव : युनियन जिमखाना मैदानावरती सिघन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत के. आर. शेट्टी संघाने टिळकवाडी क्लबचा 4 गड्यांनी पराभव करुन 2 गुण मिळविले. युनियन जिमखाना मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त जवान विरेश गौडर, शंकर कुगडोळी, राघवेंद्र, एन. बी. पाटील, विजय कुरी व अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते. टिळकवाडी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 144 धावा केल्या. त्यात दीपक बिल्लने 3 षटकार 2 चौकारासह 48, रोहीत दोडवाडने 3 चौकारांसह 19, वेदांत कोकितकरने 2 षटकारासह 18, ओमकार पाटीलने 3 चौकारासह 17, शिवम यादवने 3 चौकारासह 13 तर मालु जी.एम.ने 11 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे मिलिंद बेळगावकरने 12 धावांत 2, संतोष सुळगे-पाटीलने 38-2, सुनिल सक्री, राहुल शिंदे, शिवाजी पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 19.2 षटकात 6 गडी बाद 145 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. राहुल शिंदेने 1 षटकार 4 चौकारासह 49, गुरुप्रसाद पोतदार 4 चौकारासह 24, प्रशांत लायंदरने 2 चौकारासह 18, प्रणय शेट्टीने 13 तर संतोष सुळगे-पाटीलने 12 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे ओमकार पाटीलने 23 धावांत 3 तर रोहीत दोडवाड, कुनाल हिरोजी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Previous Articleओजस गडकरीचे आक्रमक दमदार शतक
Next Article अटीतटीच्या लढतीत आज बाजी कोणाची?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









