शाहूवाडी / प्रतिनिधी :
शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मलकापूर आंबा मार्गावरील घोळसवडे पुलावर पावसाचे पाणी आले आहे. पुलावर पाणी आले असतानाही या पुलावरुन धोकादायक वाहतूक सुरू आहे.
शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठय़ातही वाढ झाली आहे. कडवी नदीचे पाणी देखील पात्राबाहेर पडू लागले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील घोळसवडे येथील पुलावर पाणी आले आहे. तरी देखील या पुलावरुन वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात असलेल्या पावसाचा जोर मध्यरात्रीपासून चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.









