बेळगाव : हलगा-मच्छे बायपास स्थगितीच्या खटल्यावर सोमवारी सुनावणी होती. न्यायालयात युक्तिवाद झाला. मात्र रात्री उशिरापर्यंत निकाल देण्यात आला नाही. त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मंगळवारी निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. मात्र त्या स्थगितीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणच्या वकिलांनी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर सुनावणी होऊन सोमवारी निकाल देण्यात येणार होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणने सदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. याचबरोबर कामही पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वकिलांनी केली होती. शेतकऱ्यांचे वकील अॅड. रविकुमार गोकाककर यांनी त्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे सायंकाळी निकाल देण्यात येणार होता. मात्र न्यायालयाने निकाल उशिरापर्यंत दिला नाही. त्यामुळे त्या निकालाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागून आहे.
Previous Articleराष्ट्र विकासात युवावर्गाची भूमिका महत्त्वाची!
Next Article सोमवारी काही नगरसेवकांनी दिला मालमत्तेचा तपशील
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









