कार्यकर्त्यांनी घरोघरी केला प्रचार
वार्ताहर /किणये
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना वाघवडे गावातून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार केला आहे. आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा ठाम निर्धार गावातील समितीचे नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी केला आहे. पश्चिम भाग हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातून समितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अधिक मतदान झाले आहे. यावेळचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले हे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन काम करणारे असल्यामुळे त्यांना मतदान करून निवडून आणूया. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व महिलांनी सहकार्य केले पाहिजे, असे आर. के. पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
वाघवडे, मच्छे, संतीबस्तवाड, किणये भागातील शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी म. ए. समितीच्या माध्यमातून आंदोलन करून आवाज उठविण्यात आला होता. तसेच रिंगरोड प्रस्तावाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने चाबूक मोर्चा काढला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे म. ए. समिती असून आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा उपस्थित कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार केला आहे. य् ाावेळी विष्णू पाटील, दुर्गाप्पा कांबळे, विष्णू चापगावकर, विठ्ठल पाटील, गंगाराम केनूरकर, शिवाजी अबोळकर, कृष्णा कुडेकर, के. के. पाटील, बबन शहापूरकर, महादेव अंबोळकर, अनंत कणबरकर, कामाना कणबरकर, परशराम पाटील, परशराम केनूरकर, पाडूरंग बेळगुंदकर, यल्लाप्पा अंबोळकर, कृष्णा बेळगुंदकर, मंगेश पाटील, संजय पाटील, मुकूंद कुडेकर, रोहन कुडचीकर, प्रीतम गुरव आदी उपस्थित होते.









