चोरटे प्रसार, वाहनासह साहित्य जप्त, सौंदरी ग्रामस्थांची सजगता
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
सौंदरी ता. महाबळेश्वर या गावात चोरीच्या प्रयत्नात असणाया टोळीचा कट ग्रामस्थांनी आणला उघडकीस तर चोर पळून जाण्यात यशस्वी. चोरीसाठी वापरण्यात येणारी गाडी व इतर साहित्य पोलिसांनी केले जप्त. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे .
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी अज्ञातांनी सोनाट कडे जाणारा लोखंडी पूल संपूर्णपणे चोरून नेला होता. तर विजेचे पोलही चोरून नेल्याची प्रकार घडले आहेत. याबाबत अजूनही कसलीही माहिती मिळाली नाही त्यातच आज ऐक पीक अप गाडी आणि त्यामध्ये गॅस कटर, सिलेंडर असा मुद्देमाल ग्रामस्थांनी पोलिसांना पकडुन दिला आहे. त्यामुळे चोरीच्या तयारीत असणाया या टोळीचा कट उघडकीस येणार आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोर पळून गेल्याने या परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
महाबळेश्वर पोलिसांचे या चोरांना पकडण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून पोलीस टीम संशयित शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहे. घटनास्थळी गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत.
तापोळा पोलीस चौकीचे मुलाणी , चव्हाण हे गावकयांच्या माहितीवरून पिकप गाडीच्या नंबर वरून गाडीच्या मालकाचा शोध घेत आहेत.
परंतु गाडीचा नंबर हा चुकीचा असल्याने संशय आणखी वाढला आहे. त्यामुळे आरोपींना शोधणे पोलिसांना आव्हान निर्माण झाले आहे. 105 गावांमध्ये कुठलाही चोरी सारखा प्रकार होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत व शंभर टक्के आरोपीचा शोधून घेवून आम्ही आरोपी अटक करणार आहोत
पोलीस कर्मचारी मुलाणी यांच्या निदर्शनास आले आहे की जो गाडीचा नंबर आहे तो चुकीचा आहे संशईत आरोपी आहेत त्यांचा शिताफिने शोध घेऊन त्यांना जेलबंद करण्याचं प्रयत्न चालू आहे व आपल्या 105 गावांमध्ये कुठलाही चोरी सारखा प्रकार होणार नाही याची दक्षता घेत असून आरोपीचा आम्ही शोधून काढून जेलबंद करणार असल्याचं विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.








