कोकण हा भाग दुर्गम आह़े शेतीसह अन्य बाबींचे उत्पादन तुलनेने कमी आह़े लोकसंख्याही कमी आह़े तथापि येथे आपल्या पक्षाला उभारी देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष काम करत असतात़ गेल्या आठवडय़ाअखेर शनिवारी वंचित बहुजन आघाडीने चिपळूण तालुक्यात रामपूर परिसरात कुणबी समाज हक्क परिषद आयोजित केली होत़ी यानिमित्ताने कोकणात लक्षणीय संख्येने असलेल्या कुणबी समाजाला साद घालणे हा महत्त्वाचा उद्देश वंचित बहुजन आघाडीने ठेवला होत़ा
या पक्षाचे नेते ऍड़ प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोकणातून राष्ट्रीयस्तरावरील राजकारणात टिळक, बाबासाहेब, नाथ पै, दंडवते यांयानंतर कुणा नाव दिसत नाही. त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. आपणही आपल्यातील नेतृत्व उभं राहू दिलं नाही. ऍड़ आंबेडकर यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर टिकेची झोड उठवल़ी कोकण किनाऱयावर राजापूर परिसरात प्रस्तावित असलेल्या रासायनिक प्रकल्पांवर भाष्य करताना प्रदूषणकारक प्रकल्प कोकणात आणले जात असून येथे सातत्याने आंदोलने होत आहेत. कोकणातील निसर्ग बिघडवण्याचे काम सुरु आहे. हे थांबवायला पाहिजे. कोकणातला विकास हा विना प्रदूषणकारक होऊ शकतो. माझ्या जिह्यात केमिकल नको, असे म्हणणारे कोकणात केमिकल प्रकल्प टाकतात. कोकणात नैसर्गिक संपत्ती आहे. ती टिकवली पाहिजे.
ऍड़ आंबेडकर यांनी अनेक सामाजिक प्रश्नांचा उल्लेख आपल्या भाषणात केल़ा हे प्रश्न कोणत्या प्रकारे सोडवता येतील त्याविषयी मते त्यांनी मांडल़ी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे आणि तो सोडवला पाहिजे त्यासाठी राजकीय नेतृत्वाने जबाबदारी घ्यायला हवी, अशा आशयाचे विचार त्यांनी व्यक्त केल़े येथील बेरोजगारी संपवायची असेल तर चांगल्या दर्जाचे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. या देशावर संकट आले आहे, असे राजकारण केले जात आहे. हा फसवणुकीचा भाग आहे. माणुसकीला सोडून वागण्याचे काम सध्या सुरु आहे, या शब्दात त्यांनी विद्यमान राजकीय नेत्यांवर टीका केल़ी
खोतीचा पहिला लढा 1929मध्ये झाला. बाबासाहेबांना रायगडात ााांगला प्रतिसाद लाभला. त्यावेळी 4 आमदार निवडून आले. तेथील खोती प्रश्न मार्गी लागला असून तेथील जमिनी शेतकऱयाया नावावर आहेत. मात्र रत्नागिरीची खोती पध्दत वेगळी होती. कोकणातल्या जमिनी खोताच्या नावे नाहीत. ब्रिटिशांनी खोती निर्माण केली. खोत गावामध्ये निर्माण केला आणि त्याला मालकीची शेती दिली. शेत कसणाऱयाकडून सारा घ्यायचा, पण जमिनीचा मालक खोतच. आजही असेच आहे. रत्नागिरी जिह्यात खोती नष्ट झाली, पण सारा भरणारा व कसणारा त्याच्या नावाने झाली नाही. खोती नष्ट होण्यासाठी त्यावेळी अनेक संघटना काम करत होत्या. त्यांच्यावर प्रचंड हल्ले झाले आहेत. म्हणून हा प्रश्न शिल्लक आहे. भविष्यात या प्रश्नावर काम करणाऱयांना प्रशिक्षण देऊन खोतीच्या जमिनी घेण्याबाबत प्रयत्न करुया, अशी त्यांनी कुणबी बांधवांना ग्वाही दिली.
नाचणी, वरीसारखी पिके कोकणात डोंगर उतारावर घेतली जातात़ या पिकांना रास्तभाव मिळाला पाहिज़े अथवा ही पिके घेणाऱया शेतकऱयाला अनुदान मिळाले पाहिज़े यासाठी राज्य सरकारकडे मागणी केल्याचे ऍड़ आंबेडकर यांनी सांगितल़े कोकणात कुणबी बांधव मोठय़ा प्रमाणात नाचणी, वरीच्या पिकाशी संबंधित आहेत़ या कुणबी बांधवांना दिलासादायक ठरावे, अशी धोरणे परिषदेत व्यक्त करण्यात आल़ी वंचित बहुजन पक्षाचा विस्तार कोकणात करावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्य़ा परिषदेला प्रचंड उपस्थिती नसली तरी मांडण्यात आलेले मुद्यांचे व्यापक स्तरावर स्वागत व्हावे, अशी अपेक्षा ठेवण्यात आली होत़ी
वंचित बहुजन आघाडीने विदर्भ, मराठा याबरोबर पश्चिम महाराष्ट्रात दखलपात्र मते यापूर्वीच्या निवडणुकीत मिळवली होत़ी पक्षाला मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरी क्षेत्रात म्हणावे तसे बस्तान बसवता आले नव्हत़े कोकणातही हा पक्ष अगदी मर्यादीत वर्तुळात राहिला होत़ा प्रत्यक्ष पक्षाच्या नेत्याला पक्षाची वाढ झाली पाहिजे असेच वाटत असत़े त्यासाठी लोकांना आकर्षक वाटणारे कार्यक्रम हाती घेतले जातात़ त्या आधी धोरणांची मांडणी करून पार्श्वभूमी तयार करण्यात येत़े ऍड़ आंबेडकर यांनी परिषदेच्या निमित्ताने कोकणातील शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या उन्नतीसाठी आपला पक्ष कोणत्या स्वरूपाचा विचार करत आहे, याची मांडणी केल़ी
राजकीय पक्षांनी विशिष्ट प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्यासाठी पावले उचलण्याचा इतिहास मोठा आह़े अनेकदा आंदोलनाच्या मागे सामान्य लोक नेत्याच्या पाठीमागे ताकद उभी करतात़ आणि हे नेते शासकीय स्तरावर किंवा विधीमंडळाच्या स्तरावर आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न धसास लावत असतात़ बरेच वेळा प्रश्न सोडवण्याची कार्यकुशलता राजकीय कार्यकर्त्यांकडे अभावाने आढळते. नेते देखील त्या आघाडीवर बेतास बात असतात़ अशा पार्श्वभूमीवर खोती प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचा विचार या परिषदेत व्यक्त करण्यात आल़ा ही बाब लक्षणीय आह़े सामान्य कार्यकर्ता किचकट प्रश्नांना हात घालण्यापूर्वी प्रशिक्षित झाला तर ती बाब आशादायक ठरेल़ राजकीय अहंकारापोटी ताकदीचे प्रदर्शन अथवा आंदोलनाद्वारे केंडी करण्याची व्यूहरचना राजकारणात महत्त्वाची आह़े पण त्यापेक्षा प्रश्न कौशल्याने सोडवणे जास्त महत्त्वपूर्ण आह़े त्याकडे परिषदेत लक्ष दिले गेले ही कोकणातील शेतकऱयांना आशा वाटू शकेल़, अशी बाब आह़े
कोकणात सपाटीचा भाग कमी डोंगर उतारावर असलेले छोटे छोटे जमीन तुकडे अशी शेतीची परिस्थिती आह़े दुर्गमता हा भाग अनेक शेतीच्या तुकडय़ांसाठी अपरिहार्य आह़े आता शेतीकडे वळणारे लोक दिवसेंदिवस कमी होत आहेत़ अशावेळी कसणाऱया लोकांच्या जमीन मालकीचा प्रश्न कुणबी समाज हक्क परिषदेने ठळकपणे मांडल़ा राज्यात कुळ कायदा अस्तित्वात येऊन 60 वर्षापेक्षा अधिक काळ लोटल़ा तथापि कुळांचे दावे संपुष्टात आले नाहीत़ ठिकठिकाणी होणारे वाद आणि ते सोडवण्याची कार्यपद्धती लक्षात घेतली तर लगतच्या काळात हे वाद सुटण्याची शक्यता फारच कम़ी राजकीय कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला तरी वाद सुटण्यासाठी काही पावले पुढे पडतील़ व्यापक स्तरावर एखादा निर्णय घेऊन वाद सोडवावा, अशी परिस्थिती राहिली नाह़ी प्रत्येक प्रकरणाचा तपशील वेगळा असल्याने प्रकरण निहाय त्यावर निर्णय होणे अपेक्षित आह़े असे निर्णय करता करता मोठा कालावधी लोटत़ो त्यामुळे अनेक पिढय़ा न्यायापासून दूर राहतात, याची खंत वारंवार व्यक्त होत असत़े या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता प्रशिक्षण हा मुद्दा किमान एखाद्या राजकीय पक्षाने समोर ठेवावा ही बाब आशादायी ठराव़ी
सुकांत चक्रदेव








