भारत हा केवळ संस्कृतीनेच नव्हे तर धर्मानेही समृद्ध असलेला देश आहे. या देशात शतकानुशतके विविध धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येक धर्म अद्वितीय आहे कारण धर्माचे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. वेगवेगळ्या धर्मातील अनेक धार्मिक पुस्तके आहेत जी आपल्याला जीवनाबद्दल शिकवतात. पण प्रत्येक धर्म आणि त्यातील प्रत्येक शिकवण एकाच पायावर आधारित आहे, आणि तो पाया म्हणजे माणुसकी. माणूस स्वत:चे व इतरांचे जीवन कसे सुंदर आणि आनंददायी बनवू शकतो, हेच प्रत्येक धर्मामध्ये सांगितले आहे.
काळाप्रमाणे जसे जग बदलत आले आहे, तसेच लोकांच्या धर्माच्या व्याख्या व त्यांची विश्वासप्रणालीदेखील विकसित होत गेली आहे. आजकाल धर्म हा कोणत्याही देशापुरता मर्यादित नाही. ज्याला अध्यात्माच्या मार्गावर चालायचे आहे, तो त्याला हवा तो कोणताही धर्म स्वीकारू शकतो. विशेषत: हिंदू धर्मामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, समर्थ रामदास इत्यादी अनेक महनीय सद्गुऊ आणि संत होऊन गेले ज्यांनी आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले होते. त्यांची शिकवण लोक आजही पाळतात आणि त्यांच्या महानतेचे आजही पूजन करतात. आजच्या काळातदेखील काही सद्गुऊ आहेत जे आपल्या समाजकार्यामुळे आणि शिकवणीतून लोकांचे आयुष्य अधिक सुंदर करायचा प्रयत्न करत आहेत. सद्गुऊ जग्गी वासुदेव यांनी इशा फौंडेशनची निर्मिती केली आहे आणि तिथे ते लोकांना सात्विक आहार, योग साधना इत्यादीचे महत्त्व शिकवतात. त्याचबरोबर श्री श्री श्री रवीशंकर, बी. के. शिवानी असे अनेक आध्यात्मिक गुऊ सतत समाजाच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक उद्धारासाठी अनेक कार्ये करताना दिसतात.
ते भारतीय संस्कृती आणि धर्माचा तऊण पिढीलादेखील नव्याने परिचय करून देत आहेत. पण प्रत्येकजण आपल्या संस्कृतीशी आणि धर्माशी जोडलेला नसतो. त्यात काही गैर अजिबात नाही. समाजवादी वृत्ती ठेवून, आपल्या व इतरांचे कल्याण जोपर्यंत माणूस करत आहे तोपर्यंत तो कोणत्याही दृष्टिकोनाने अकार्यक्षम ठरत नाही.
पण, जिकडे चांगली सकारात्मक शक्ती आहे, तिकडे विनाशक नकारात्मक वृत्ती देखील असते. अलीकडे, स्वयंघोषित देवमाणूस नित्यानंद खूप चर्चेमध्ये आहे. पण कोणते सामाजिक कार्य किंवा कोणत्या सकारात्मक विचारांसाठी नाही, तर अमेरिका या देशातील तब्बल 30 शहरांची फसवणूक केल्यामुळे. स्वामी नित्यानंदने नित्यानंद ध्यानपीता नावाची धार्मिक संस्था स्थापन केली आहे. पण त्या व्यतिरिक्त, त्याच्या नावावर अनेक आरोप आहेत. अशी चर्चा आहे की याच कारणामुळे, तो भारत देश सोडून निघून गेला आहे आणि त्याने ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ नावाचे बनावट राष्ट्र स्थापन केले आहे. आणि याच बनावटी देशाच्या आधारावर त्याने अमेरिकेतल्या 30 शहरांची फसवणूक केली आहे. नेवार्क, न्यू जर्सी या अमेरिकन शहराला याच खोट्या हिंदू राष्ट्र कैलासाने जानेवारीमध्ये पाच दिवसांच्या कालावधीत फसवले होते. शहराचे महापौर रास बारका यांनी कथित-काल्पनिकसह ‘भगिनी शहर’ भागीदारीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण नेवार्क शहराला पाठवले होते. या बनावट शहराशी करार केल्यानंतर, नेवार्क शहराला हा घोटाळा लक्षात आला आणि त्यांनी हा करार त्वरित रद्द केला.
पण आता प्रŽ असा पडतो की काही लोकांसाठी भारतीय धर्म आणि संस्कृती हे मोक्ष मिळवण्याचा मार्ग नसून, एक स्वार्थी व्यवसाय का झाला आहे? काही लोक विशिष्ट धर्माच्या नावाखाली स्वार्थ का उधळत आहेत? आणि हे कधी आणि कसे संपेल? सर्वात प्रथम म्हणजे, एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने कुतूहल मनात ठेवून आपल्या किंवा आपल्या पूर्वजांच्या धर्माबद्दल किंवा संस्कृतीबद्दल जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक धर्माचा इतिहास खूप खोल आहे. इंटरनेटवर अनेक प्रकारची माहिती उपलब्ध असल्याने, या गोष्टींबद्दल दिशाभूल होणे सोपे आहे. अशा वेळेला सर्वप्रथम आपल्या घरात पाळल्या जाणाऱ्या प्रथा, त्यामागचा इतिहास हा आपल्या घरातील वरिष्ठांकडून समजून घेतला पाहिजे. त्यांच्याशी या विषयाबद्दल चर्चा केली पाहिजे. बरेचदा घरातल्या वरिष्ठांशी बोलले की आपल्याला भरपूर माहिती मिळू शकते. त्याचबरोबर, कोणत्याही गोष्टीवर किंवा माणसावर आंधळा विश्वास ठेवण्याआधी त्याबद्दल पूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे. जर कोणी तुमच्या जीवनात नवीन नियम स्थापित करत असेल, विशेषत: जेव्हा धर्माचा प्रŽ येतो, तर शंकास्पद वाटणाऱ्या गोष्टींवर प्रŽ विचारणे महत्त्वाचे आहे.
जीवनात आपण निवडलेल्या मार्गामुळे कोणाचे नुकसान तर होत नाही ना, कोणाला त्रास होत नाही ना, व पुढे जाऊन या मार्गाचा समाजाला फायदा नक्की होतो आहे का याचा विचार केला पाहिजे. धर्माची खास गोष्ट हीच आहे की कोणताही धर्म हा चांगला किंवा वाईट नसतो. खरंतर धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही. जरी एखादी व्यक्ती नास्तिक असली तरी तिचा त्याच्या याच विश्वासावर ठाम विश्वास असतो. आणि हाच विश्वास त्याला जीवनात मदत करतो. प्रत्येक धर्म, जो पूर्वापार या जगात चालत आला आहे तो प्रामाणिकपणा, प्रेम, त्याग, कऊणा आणि विश्वास याच सगळ्या गोष्टी शिकवतो. किंबहुना धर्माचा शोध याच सर्व गोष्टी जगात जोपासण्यासाठी झाला असावा. या व्यतिरिक्त जर लोकांची फसवणूक करून, आयुष्यात त्यांची दिशाभूल करून, त्यांच्या जवळच्या माणसांना सोडून जर जबाबदाऱ्यांचा त्याग करायला कोणताही धर्म सांगत असेल तर तो खरोखरच धर्म आहे का याचा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. आपल्या पूर्वजांच्या प्रथा परंपरा किंवा आपल्याला आवडणाऱ्या धर्माचे पालन करताना हे मात्र लक्षात नक्कीच ठेवा, सर्वात मोठा धर्म हा ‘मानव धर्म’ आहे. तो पाळला तर आपले जीवन तर सुखी होईलच, त्याचबरोबर समाजदेखील आनंदी राहील.
– श्राव्या माधव कुलकर्णी








