नवी दिल्ली
देशातील फार्मा उद्योग जवळपास 8 ते 11 टक्क्यांच्या दराने वाढत जाणार असल्याचे संकेत अल्केम लॅबोरेट्रीज यांनी व्यक्त केले आहेत. अल्केमच्या वार्षिक 2021-22 च्या अहवालामध्ये या संदर्भात दावा करण्यात आला आहे. यासोबतच कोविड 19 च्या महामारीनंतर आर्थिक सुधारणात्मक स्थिती बदलत जात ही स्थिती सामान्य होणार असून याचा लाभ औwषध क्षेत्रालाही होणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे.
प्राप्त अहवालानुसार कोरोना प्रतिबंधात दिलेली सुट, प्रवासासाठी मुभा, पुरवठा साखळी सुरळीत होण्यासह निर्मिती प्रक्रियेला आलेला वेग या स्तरावर औषध उद्योगाला गती घेता आली आहे. जागतिक स्तरावर काही देशात कोरोना असून तेथे आताही कोरोनाशी संबंधीत औषध, उपचाराची व्यवस्था केली जात आहे.









