नवी दिल्ली
गेल्या जून महिन्यात पेट्रोल व डिझेल इंधनाची मागणी काहीशी अधिक राहिली असल्याचे दिसून आले आहे. जून 2022 मध्ये इंधनाची विक्री 5 टक्के इतकी वाढली आहे. मागच्या वर्षी समान महिन्याशी तुलना करता पेट्रोल 23 टक्के आणि डिझेल 24 टक्के इतकी अधिक विक्री वाढली आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये कोरोनाने डोके वर काढले होते. त्यामुळे विक्रीवर त्या काळात परिणाम जाणवला होता.








