बेळगाव : मारुती गल्ली, अनगोळ येथील कूपनलिका महिनाभरापासून बंद आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याविना गैरसोय होत आहे. महापालिकेकडून दुरुस्तीसाठी चालढकल केली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: महिला वर्गांना पाण्यासाठी इतरत्र वणवण करावी लागत असल्याने दुरुस्तीची मागणी केली जात आहे. कूपनलिकांची वेळेत दुरुस्ती केली जात नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. पाणीपुरवठ्याबाबत शाश्वती नसल्याने परिसरात कूपनलिका महत्त्वाच्या ठरत आहेत. परंतु मारुती गल्ली अनगोळ येथील कूपनलिका दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे.
वेळेत दुरुस्ती करण्याची मागणी
यापूर्वीही कूपनलिकेत पाणी असतानाही मोटरची दुरुस्ती नसल्याने बरेच महिने पाण्याची गैरसोय झाली होती. यावेळी तरी वेळेत दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









