काँग्रेसचा पाठिंबा
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी पगार मिळण्यासाठी दुसऱ्या दिवशीही आपले काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. सफाई कंत्राटी कामगारांना ठेकेदाराने जून, जुलै चा पगार दिला नव्हता .हा पगार मिळावा यासाठी पंधरवड्यापुर्वी कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते त्यानंतर ठेकेदाराकडून दोन महिन्याचा पगार देण्याच्या आश्वासन दिले होते. परंतु हा पगार मिळाला नव्हता .त्यामुळे मंगळवारपासून या कामगारांना काम बंद आंदोलन सुरू केले. यादरम्यान , ठेकेदाराने कामगारांचा एक महिन्याचा पगार दिला . परंतु कामगारांना जून बरोबर जुलै महिन्याचाही पगार हवा आहे. त्यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. काँग्रेसचे समीर वंजारी यांनी या कामगारांना पाठिंबा दिला आहे.









