रत्नागिरी :
शहरातील पेठकिल्ला भाटकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने तीन दुचाकी जाळल्याने खळबळ उडाल़ी या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणीच असलेल्या एका जुन्या बॅनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागात पथसंचलन केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासासाठी 6 जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले आह़े
इम्तियाज मिरकर, फजल इस्माईल मिरकर व निहाल मुल्ला यांच्या मालकीच्या या दुचाकी होत्य़ा तिघांनीही आपल्या या दुचाकी घराशेजारी मोकळ्dया जागेत उभ्या करून ठेवल्या होत्य़ा 26 जून रोजी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने या दुचाकींना आग लावल़ी यात बुलेटसह (एमएच 09 एफएस 9000) अॅक्टिव्हा व अॅक्सेस गाडीचा समावेश आह़े आगीमध्ये तिन्ही गाड्या जळून खाक झाल्य़ा पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
- घटनास्थळी जुन्या बॅनरवर लिहिलेल्या मजकुराने तणाव
दुचाकींना आग लावलेल्या ठिकाणी असलेल्या एका जुन्या बॅनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे परिसरातील मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाला होत़ा स्थानिक नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आल़ा त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होत़ी घडल्या प्रकाराबाबत तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल़ी
- जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी
दुचाकींना लावण्यात आलेल्या आगीमुळे पेठकिल्ला परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होत़ी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर व शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी घटनास्थळी भेट दिल़ी बगाटे यांनी जळीत ठिकाणाची पाहणी करत जमावाला शांततेचे आवाहन केल़े
- गुन्हेगारांना लवकरच गजाआड करू – पोलीस अधीक्षक
दुचाकींना अज्ञाताने लावलेली आग व त्याठिकाणी आढळून आलेला मजकूर यामुळे परिसरात अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होत़ी दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी परिसरात पथसंचलन केल़े सर्व तपास करून आरोपींचा शोध घेतला जात आह़े लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. आरोपींना लवकरच पकडले जाईल. नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिकांना केले.
- तपासासाठी सहा जणांचे विशेष पथक
दुचाकी जळीतप्रकरणी निहाल मुल्ला यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून यात 1 लाख 95 हजार ऊपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आह़े त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविऊद्ध भारतीय न्याय संहिता 196(1), 324(5) नुसार गुन्हा दाखल केल़ा सखोल तपासासाठी पोलिसांकडून 6 जणांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.








