नवी दिल्ली
तामिळनाड मर्कंटाइल बँक आपला आयपीओ शेअर बाजारात दाखल करणार असल्याची माहिती असून यायोगे बँक 830 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. येत्या सोमवारी म्हणजे 5 सप्टेंबरला बँकेचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुला होणार असून 7 सप्टेंबरपर्यंत यात गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे. आयपीओसाठी प्रति समभागाचा भाव 500-525 रुपये इतका असणार आहे.









