कोल इंडियाचे अध्यक्षाची माहिती
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने मंगळवारी सांगितले की, गेल्या चार वर्षांत कोळशाच्या किमतीत वाढ झाली नाही. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत अतिशय स्पर्धात्मक किमतीत पुरवठा करणे सुनिश्चित केले. उत्पादन वाढवण्यासाठी आणि आवश्यक पातळीवर पुरवठा करण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे जेणेकरून देशाला वाजवी दरात वीज मिळेल, असे कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी कंपनीच्या 48 व्या सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले.
देशातील एकूण कोळशाच्या पुरवठय़ापैकी 80 टक्के पुरवते
‘ज्या वेळी आंतरराष्ट्रीय कोळशाच्या किमती खूप जास्त असतात, अशावेळी कोल इंडिया भारतीय ग्राहकांना अत्यंत स्पर्धात्मक किमतीत कोळशाचा पुरवठा करत आहे आणि गेल्या चार वर्षात किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, असेही अग्रवाल म्हणाले.
सीआयएल प्रमुखांनी यापूर्वी सांगितले होते की, कंपनी ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ लक्षात घेऊन कोळशाच्या किमती सुधारण्याबाबत सर्व भागधारकांशी चर्चा करत आहे.









