उत्तरचे आमदार राजू सेठ समारंभाचे प्रमुख पाहूणे
बेळगाव : अशोकनगर येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दर्जाचा 50×25, 10 लेनच्या जलतरण तलावाचे रीतसर उद्घाटन उतरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते बुधवारी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी., मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, पोलीस अधिकारी डीसीपी नारायण बरमनी, अर्जुन पुरस्कार प्राप्त मुकुंद किल्लेकर, अशोक शिंत्रे, प्रशिक्षक विश्वास पवार, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार, महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, जलतरणपटू पालक व जलतरणप्रेमी उपस्थित राहणार आहेत, असे आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबते कळवितात.









