बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमधे देवेंद्र जिनगौडा शिक्षण संस्था शिंदोळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सुहर्ष कंभारने 400 मी. अडथळा शर्यत प्रथम, लांबउडी आणि 200 मी. धावणे द्वितीय, मनोज मल्लनवर उंचउडी द्वितीय, प्रज्ञा हिंदीनमणी, समीक्षा शहा, रतन पाटील, गगन हंपन्नावर, अद्वैत पाटील, बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच कराटेमध्ये मनोज मोदगेकर 35 किलो गटात प्रथम, मेघा पाटील 100 मी. अडथळा शर्यत तृतीय. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक, शिक्षकवर्ग तसेच मुख्याध्यापिका व संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Previous Articleज्योती अॅथलेटिक्स स्पोर्ट्सचे यश
Next Article जलतरण तलावाचे आज उद्घाटन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









