ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्याचा व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था / कोलकाता
येथील ईडन गार्डन्स पार पडलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरोध सनरायजर्स हैदराबाद यांच्या सामन्यादरम्यान सनरायजर्स हैदाराबादचा अष्टपैलू कमिंदू मेंडिसचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. कमिंदू मेंडिसने त्या सामन्यात उजव्या हाताने ऑफब्रेक आणि डाव्या हाताने स्लो लेफ्टआर्म गोलंदाजी करताना दिसत आहे. 13 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रघुवंशीला मेंडिसने बाद केले. 26 वर्षीय कमिंदू मेंडिस हा लंकेचा खेळाडू असून आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत आहे. त्याला सनरायजर्स हैदाराबादने लिलावात 75 लाखाला खरेदी केले आहे. लंकेतर्फे त्याने 12 कसोटी, 19 वनडे, 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.









