बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्लस्टर व टिळकवाडी विभागीय माध्यमिक विभागाच्या बुद्धिबळ व योगा स्पर्धांचे आयोजन जी. जी. चिटणीस व रजपूत बंधू स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुद्धिबळ व योगा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत 125 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. केएलएस स्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या बुद्धिबळ व योगा स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे जी. जी. चिटणीस स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार, रजपूत बंधू स्कूलचे मुख्याध्यापक पी. वाय. माक्कन्नावर, केएलएस स्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक-देसाई व सारिका नाईक, टिळकवाडी विभागीय शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील व बापू देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी केएलएस स्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते बुद्धिबळाची चाल करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत माध्यमिक विभागात 22 शालेय संघांनी तर प्राथमिक विभागात 33 शालेय संघांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी प्रवीण पाटील, रामलिंग परीट, जयसिंग धनाजी, उमेश बेंळगुंदकर, अर्जुन भेकणे, ब्रिजेस सोलोमान, किरण तारळेकर, देवेंद्र कुडची, सिल्विया डिलिमा, उमेश मजुकर, देवकुमार मगनाकर, हिरण्णा कुरबेट, महारुद्रा यम्मी, हेमलता पुरी आदी क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
Previous Articleश्रीनाथ दळवीचा सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









