56 वी फादर एडी स्मृती चषक स्पर्धा
बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाइडतर्फे सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतीचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यांत सेंट पॉल्स हायस्कूल, सर्वोदय हायस्कूल खानापूर, एम. व्ही. हेरवाडकर, आंगडी इंटरनॅशनल हायस्कूल संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात कऊन उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. सेंटपॉल्स हायस्कूल (हॉस्टेल)पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सकाळी पहिल्या सामन्यात अंगडी इंटरनॅशनल हायस्कूल संघाने सेंट झेवियर्स हायस्कूल संघावर 2-0 असा विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्यात सर्वोदय हायस्कूल खानापूर संघाने संत मीरा हायस्कूल संघावर चुरशीच्या लढतीत 2-1 असा निसटता विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात सेंट पॉल्स हायस्कूल संघाने भरतेश इंग्रजी माध्यम हायस्कूल संघावर 5-1 असा एकतर्फी विजय संपादन केला. उद्या शनिवारी दुपारी 2-30 वाजता सेंट पॉल्स हायस्कूल विऊद्ध सर्वोदय हायस्कूल खानापूर यांच्यात पहिला उपांत्य सामना तर दुपारी 4-00 वाजता एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल विऊद्ध आंगडी इंटरनॅशनल हायस्कूल यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.









