वृत्तसंस्था /बुलावायो
2023 च्या भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या पात्र फेरी सामन्यात श्रीलंकेने स्कॉटलंडचा 82 धावांनी दणदणीत पराभव केला. पात्र फेरीची ही स्पर्धा झिंबाब्वेमध्ये खेळवली जात आहे. या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेचा डाव 49.3 षटकात 245 धावात आटोपला. त्यानंतर लंकेने स्कॉटलंडला 29 षटकात 163 धावात गुंडाळून हा सामना 82 धावांनी जिंकला. लंकेच्या महीश तीक्षणाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. लंकेच्या डावामध्ये सलामीच्या निशांकाने 10 चौकारासह 75, असालेंकाने 65 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 63, समरविक्रमाने 4 चौकारासह 26, धनंजय डिसिल्वाने 2 चौकारासह 23, हसरंगाने 2 चौकारासह 15, महेश तीक्षणाने 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमवल्या. स्कॉटलंडतर्फे ग्रीवेसने 32 धावात 4, वॅटने 52 धावात 3, सोलेने 46 धावात 2, तसेच इव्हान्सने 35 धावात 1 गडी बाद केला. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 24 चौकार नोंदवले गेले. त्यानंतर स्कॉटलंडच्या डावात मॅकब्रिडेने 38 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 29, मॅथ्यू क्रॉसने 1 चौकारासह 7, मॅकमुलेनने 1 चौकारासह 5, कर्णधार बेरिंग्टनने 2 चौकारासह 10, लिसेकने 1 चौकारासह 5, ख्रिस ग्रिवेसने 2 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 56, वेटने 2 चौकारासह 14 आणि सोलेने 2 चौकारासह 17 धावा जमवल्या. स्कॉटलंडच्या डावात 3 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. लंकेतर्फे महीश तीक्षणाने 41 धावात 3, हसरंगाने 42 धावात 2, रजिता, कुमारा आणि शनाका यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका 49.3 षटकात सर्वबाद 245 (निशांका 75, असालेंका 63, समरविक्रमा 26, डिसिल्वा 23, ग्रीवेस 4-32, वॅट 2-52, सोले 2-46),
स्कॉटलंड 29 षटकात सर्वबाद 163 (मॅकब्रिडे 29, बेरिंग्टन 10, ग्रीवेस नाबाद 56, वॅट 14, सोले 17, महीश तीक्षणा 3-41, हसरंगा 2-42, रजिता, कुमारा, शनाका प्रत्येकी एक बळी).









