वार्ताहर /खानापूर
खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव होते. मराठा मंडळ संस्थेचे संचालक परशराम गुरव यांच्या हस्ते सरस्वतीचे फोटोपूजन तर संचालक शिवाजी पाटील यांनी क्रीडा ध्वजारोहण केले. खानापूर तालुका शारीरिक शिक्षण अधिकारी सुरेखा मिरजे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत शाळेच्या क्रीडा शिक्षिका ए .टी. पाटील यांनी केले. प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या सुरेखा मिरजे यांनी आपल्या भाषणात 21 व्या शतकामध्ये शारीरिक शिक्षण कसे महत्त्वाचे आहे, आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळांचे महत्त्व यावर आपले विचार मांडले. यावेळी विद्यार्थिनीनीं पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी कार्यक्रमाचा उद्देश व खेळाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन एल. आर. पाटील यांनी तर आभार व्ही. एस. मन्नोळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थिनीं व कर्मचारी उपस्थित होते.









