स्मरण मंगळूरकर, ओम जुवळी यांना सुवर्णपदके
क्रीडाप्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना मान्यताप्राप्त व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित मालवण येथील चिवला बीच समुद्रामध्ये घेण्यात आलेल्या विविध वयोगटातील मुला मुलींच्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी भरघोस यश संपादन केले.
या स्पर्धेत 800 जलतरणपटूंचा सहभाग असलेल्या या जलतरण स्पर्धेत कुमार स्मरण मंगळूरकरने ग्रुप 5 मध्ये 5 किलोमीटरच्या शर्यतीत 37.03 मिनिटाचा अवधी घेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. तसेच दिव्यांगाच्या स्पर्धेत ग्रुप 11 मध्ये कुमार ओम जुवळीने एक किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. कुमार आदित्य गडकरीने ग्रुप 4 मध्ये पाच किलोमीटर स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक मिळविले. मुलींच्या गट क्रमांक 1 मध्ये दिशा होंडीने 1 किलोमीटरच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले. तर आरोही चित्रगारने याच गटामध्ये 8 क्रमांक पटकाविला. श्रेष्ठा रोटीने ग्रुप 3 मध्ये व युवराज मोहनगेकरने ग्रुप 2 मध्ये दहावा क्रमांक पटकावला.
विजेत्या सर्व स्पर्धकांना आयोजकातर्फे प्रशस्तीपत्र, पदक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. धवल हनमनावर , सुमेध गडकरी, राधिका मोहनगेकर, वैजनाथ सोनपनावर, अमोघ परमाज, अद्वैत जोशी व ओवी जाधव यांनी देखील या स्पर्धेत भाग घेऊन यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली.
या सर्व जलतरपटूंना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, मारुती घाडी, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, किशोर पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे पदाधिकारी अॅड. मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी व शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे.









