श्री रामदास स्वामी मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
देवसू खालचीवाडी येथील श्री रामदास स्वामी मठात शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी श्री रामदास नवमी उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मठात सकाळी १० वाजता श्री रामदास स्वामी प्रतिमेचे पूजन, सकाळी ११ वाजता आरती व तीर्थ प्रसाद, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता नामस्मरण, सायंकाळी ५ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. रात्री ९:३० वाजता भूमिका दशावतार लोककला मंडळ (मळगाव) यांचे ‘देव अवतारी संत बाळूमामा’ हे नाटक होणार आहे. भाविकानी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भक्त मंडळाने केले आहे.









