बेळगाव : आरपीडी महाविद्यालय व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मि.आरपीडी कॉलेज शरीरसौष्ठव स्पर्धेत विशाल निलजकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. आरपीडी हा मानाचा किताब पटकाविला. तर किशोर कुरबरने उत्कृष्ट पोझरचा मान मिळविला. आरपीडी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण, एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानाचे चेअरमन आनंद सराफ, आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, आशिया पंच अजित सिद्दन्नावर व क्रीडा निर्देशक डॉ. रामकृष्ण एन. उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुंडलिक जैनोजी, गंगाधर एम.सह इतर मान्यवर उपस्थित होते.
टॉप 5 शरीरसौष्ठवांचा निकाल
1) विशाल निलजकर-लिंगराज, 2) राम बेळगावकर, 3) अक्षय जाधव 4) गणेश सांगावकर 5) संदीप शेट त्यामध्ये विशाल निलजकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. आरपीडी हा मानाचा किताब पटकाविला. तर उत्कृष्ट पोझर आरपीडीच्या किशोर कुरबरने पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाचाकिताब, चषक, पदके व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, गंगाधर एम., हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, सुनील राऊत, सुनील पवार, नूर मुल्ला व आकाश हुलीयार यांनी काम पाहिले.









