मुंबई
भारतीय शेअरबाजारात अदानी समूहातील अदानी पॉवर व अदानी विल्मर यांचे समभाग सोमवारी वधारताना दिसले. यात अदानी विल्मर कंपनीचे समभाग 3.91 टक्के इतके वाढत 455 रुपयांच्या उच्चांकावर पोहचले होते. तर दुसरीकडे आणखी एक कंपनी अदानी पॉवर यांचे समभाग 4.99 टक्के वाढत 163 रुपयांवर पोहचले होते, जे एक वर्षाच्या उच्चांकावर असल्याची माहिती आहे. लवकरच अदानी पॉवर व अदानी विल्मरचा समभाग निफ्टीत समावेश होणार आहे.









