वृत्तसंस्था/ सिंगापूर
येथे सुरू असलेल्या 2023 च्या सिंगापूर स्मॅश आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या शरथ कमल आणि जी. साथियान यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात सिंगापूरच्या 16 वर्षीय इझाकने भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता शरथ कमलचा 11-4, 11-6, 12-10 अशा 3-0 गेम्समध्ये एकतर्फी पराभव केला. हा सामना केवळ 28 मिनिटे चालला होता. दुसऱ्या एका सामन्यात दक्षिण कोरियाच्या 17 व्या मानांकित जेंग वुजेनने भारताच्या जी साथीयानचा 3-2 अशा गेम्समध्ये (11-6, 7-11, 15-17, 11-6, 11-5) असा पराभव केला. या स्पर्धेतील महिलांच्या एकेरीतील प्रमुख ड्रॉच्या सामन्यांना रविवारी प्रारंभ होत असून मनिका बात्रा भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.









