वृत्तसंस्था/ व्हिएट ट्री (व्हिएतनाम)
2024 साली होणाऱ्या एएफसी महिलांच्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आयोजिलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेमध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाचे आव्हान समाप्त झाले.
या पात्र फेरीच्या स्पर्धेतील फ गटातील शनिवारी राऊंड एक मधील झालेल्या सामन्यात भारताने यजमान व्हिएतनामला 0-0 बरोबरीत रोखले. पात्रतेसाठी भारताला हा सामना जिंकणे जरुरीचे होते. फ गटातून भारत आणि व्हिएतनाम यांनी तीन सामन्यातून प्रत्येकी समान 7 गुण घेत संयुक्त अग्रस्थान मिळवले पण सरस गोल सरासरीच्या जोरावर व्हिएतनामने भारताला मागे टाकले. या स्पर्धेत व्हिएतनामने +14 तर भारताने +13 गोल केले. त्यामुळे व्हिएतनामचा संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.









