वृत्तसंस्था/ हरारे
विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप 4 महिन्यांचा का कालावधी बाकी आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहेत. 8 संघ आधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ पात्रता फेरी खेळून प्रवेश मिळवतील. क्वालिफायर फेरीत झिम्बाब्वे संघ शानदार प्रदर्शन करत आहे. संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. झिम्बाब्वे संघ अ गटात गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. संघाच्या या विजयामागे सीन विलियम्स याचा मोलाची भूमिका आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाच्या खास यादीत स्थान मिळवले आहे. झिम्बाब्वेचा 36 वर्षीय फलंदाज सीन विल्यम्सने सलग 5 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विल्यम्सने सलग 5 सामन्यात 532 धावा केल्या आहेत. तर विराटने 596 धावा केल्या आहेत. विल्यम्सने यासोबतच 60 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस पाडला आहे. या बाबतीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 537 धावा केल्या आहेत.









