वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप’मधील अलीकडील सुवर्णपदक विजेत्या कामगिरीनंतर भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक क्रमवारीत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान मिळविले आहे. या आठवड्यात जाहीर झालेल्या विश्व बॅडमिंटन महसंघाच्या जागतिक क्रमवारीत त्यांना पुऊषांच्या दुहेरी गटात पाचवे स्थान प्राप्त झाले आहे.
रान्कीरे•ाr आणि शेट्टी या आघाडीच्या भारतीय जोडीने बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. 1965 नंतरचे या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे आणि पुऊषांच्या दुहेरी गटातील पहिले पदक आहे. रान्कीरे•ाr आणि शेट्टी यांनी ओंग येव सिन-टिओ इओ यी या मलेशियन जोडीचा 16-21, 21-17, 21-19 असा पराभव केला. भारतीय जोडीने पहिला गेम गमावला. पण त्यांनी पुढच्या दोन गेम्समध्ये पुनरागमन करत जेतेपद पटकावले.
त्यापूर्वी उपांत्य फेरीत त्यांचा सामना टोकियो ऑलिम्पिकमधील विजेत्या चिनी तैपेईच्या ली यांग आणि वांग ची-लिन यांच्याशी झाला होता. भारतीय जोडीने त्यात पहिला गेम 21-18 असा जिंकला होता. त्यानंतर वांग ची-लिनच्या दुखापतीमुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सामना मध्यावर पोहोचलेला असताना सोडून दिल्याने त्यांना पुढे चाल मिळाली होती.
या पदकासाठी मी आणि सात्विकने खूप मेहनत घेतली होती आणि आम्ही शेवटी जेतेपद जिंकू शकल्याने मी खूप आनंदित आहे, असे सुवर्णपदक जिंकल्यानंतर शेट्टीने म्हटले होते. तर रान्कीरे•ाrने देशाला आणखी ख्याती मिळवून देण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत राहू, अशी प्रतिक्रिया दिली होती.









