क्रीडाप्रतिनिधी /बेळगाव
आंतर शाळा व युवा मिनिस्टरी स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्रीय शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत बेन्सन इंटरनॅशनल अकॅडमीचा विद्यार्थी सार्थक चव्हाणची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे
सार्थकने 300 मीटर व 500 मीटर या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविला आहे. सार्थकला प्रशिक्षक सूर्यकांत हिंदळेकर विठ्ठल व योगेश यांचे मार्गदर्शन लाभले आहे व मुख्याध्यापक जोसेफिन गुंडी प्रशिक्षक सुरज बेलदार यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









