बेळगाव : जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीमध्ये साईनाथ गोडसेने प्रथम क्रमांक पटकावित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत सेंट पॉल्स स्कूल, बेळगुंदीचा खेळाडू साईनाथ सुरेश गोडसेने प्राथमिक गटात लांब उडीत सुवर्णपदक मिळविले. बेंगळूर येथे होणाऱया राज्यस्तरीय ऍथले†िटक्स स्पर्धेसाठी त्याची बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. त्याला मुख्याध्यापक फादर रमेश फर्नांडीस, सिस्टर अनिता डिसोजा यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक रितेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









