डेपो मास्टर्स क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : डेपो मास्टर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित डेमो मास्टर्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साई काळभैरव,एस. जी. स्पोर्ट्स, संघांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. परशराम एन. व रोहीत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साई काळभैरव संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 109 धावा केल्या. त्यात परशराम एन. ने 49 तर मनोज पाटीलने 43 धावा केल्या. बेळगाव स्ट्रायकरतर्फे मोहन पाटील, हरी पवार, विकी पवार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्ट्रायकर्सने 8 षटकात 7 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात रवी चव्हाणने 19, पालाश पाटीलने 12 धावा केल्या. साई काळभैरवतर्फे अमरने 2, संदीपने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात इलेव्हन स्टारने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 50 धावा केल्या. त्यात अथर्वने 24 तर विनायकने 14 धावा केल्या. एसजीतर्फे रमेशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसजीने 6.2 षटकात 2 गडी बाद 54 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात आकाशने 30 तर रोहितने 24 धावा केल्या. या सामन्यात आकाश आणि रोहित यांनी समायोचित फलंदाजी केली.









