गोकाकचा सागर कळीमनी उत्कृष्ट पोझर, रॉ फिटनेस जिम आयोजित
बेळगाव : बेलगाम डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग अॅण्ड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित मि. रॉ क्लासीक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रुद्र जिमच्या महेश गवळीने मि. रॉ क्लासीक हा मानाचा किताब पटकाविला. तर उत्कृष्ट पोझर म्हणून गोकाकच्या सागर कळीमनीने बहुमाल मिळविला. रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन दयानंद कदम, विजय चौगुले, आशिष वर्तक, किरण परब, अरविंद घाडगे, शिवाजी माने, आनंद अकनोजी, किशोर गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करुन झाले. सदर स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढील प्रमाणे
- 55 किलो गट : 1) अजिंक्य शिंदे-रॉ फिट, 2) राहुल जी-फ्लॅक्स जिम, 3) गणेश जी-इनसाईड, 4) दीपक बेळगावकर-मोरया, 5) नितीन हुंद्ररे-मॉडर्न
- 60 किलो गट : 1) रौनक गवस-बूनआऊट, 2) सागर कळीमनी-गाकाक, 3) अक्षय मुतगेकर-रॉ, 4) अमर सांगलीकर-व्यायाम मंदिर, 5) रोहीत-रॉ
- 65 किलो गट : 1) रितीक पाटील-रुद्र, 2) जयकुमार एम.-सिद्धांत, 3) सुरज पाटील-ऑलिम्पिया, 4) श्रीधर हुंदरे-बाल हनुमान, 5) श्रीनिवास देसूरकर-कार्पोरेशन
- 70 किलो गट : 1)बसाप्पा कोनीकेरी-हिंडाल्को, 2) कपिल कामानाचे-रॉय, 3) ओम पाटील-किल्लेकर, 4) वसंत जी.-मोरया, 5)विशाल गवळी-मॉडर्न
- 75 किलो गट : 1) मनीष सुतार-बेळगाव फिट, 2) हर्ष भालनेकर-रॉय, 3) विनित करडीगुद्दी-रॉ फिट, 4) यल्लाप्पा पाटील-फ्लेक्स
- 80 किलो गट : 1) महेश गवळी-रुद्र, 2) आकाश जाधव-रॉ, 3) आकाश लोहार-रॉ, 4) अनिकेत गडकरी-रुद्र,
- 80 किलो गट वरील : 1) गजानन काकतीकर-कार्पोरेशन, 2) मलिक मुजावर-दिजु-फिट, 3) सॅन्डी सेठ-रॉ, 4) किरण जाधव-छत्रपती, 5) सार्थक पाटील-व्यायाम मंदिर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
मि. रॉ किताबासाठी अजिंक्य शिंदे, रौनक गवस, रितीक पाटील, बसाप्पा कोनीकेरी, मनीष सुतार, महेश गवळी, गजानन काकतीकर यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महेश गवळी व गजनन काकतीकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये रुद्रच्या महेश गवळीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. रॉ. फिटनेस हा मानाचा किताब पटकाविला. विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना प्रमुख पाहुणे रमाकांत कोंडुसकर, बसनगौडा पाटील, माजी नगरसेवक संजय सुंठकर, सुरेश माने, विजय चौगुले, अमन चौगुले, कांचन चौगुले यांच्या हस्ते विजेत्या महेश गवळी याला मानाचा किताब, रोख रक्कम, प्रमाणपत्र, पदक व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट पोझर सागर कळीमनीला चषक, रोख रक्कम व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून आशिष वर्तक-मुंबई,स्वामी प्रसाद-मंगळूर, राजेश लोहार, अनिल अमरोळे, रणजीत किल्लेकर, बापु पावशे, सुनील चौधरी व चेतन ताशिलदार यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून आनंद प्रदान व राजू यांनी काम पाहिले.









