बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने शारीरिक शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध तालुक्यातील 300 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ, बेळगांव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल, बेळगाव शहराच्या पीईओ जहिदा पटेल, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, क्रीडा भरती राज्यसचिव अशोक शिंत्रे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णीसह आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. क्रीडाशिक्षक रमेश अलगुडेकर, रणजीत कणबरकर, अल्लाबक्ष बेपारी, अतुल शिरोळे, वी. ए. कमते यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्याकडे सुपूर्द केली. एल. एन. कुरेर यांनी सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
Previous Articleओल्ड मंक्स संघाकडे फॅब लीग चषक
Next Article रुद्रचा महेश गवळी रॉ फिटनेस किताबाचा मानकरी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









