वाळपई : गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये बदल होऊ लागला आहे. वातावरणामध्ये बऱ्यापैकी गारवा वाढू लागल्यामुळे आंब्यांना मोहर दिसण्यास सुऊवात झालेली आहे. यामुळे आंबा उत्पादकांसाठी ही चांगली बाब असून पुढील काही दिवसांमध्ये थंडीचे वातावरण असेच सुरू राहिल्यास त्याचे अनुकूल परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहेत. यामुळे आंब्याची झाडे मोहरून चांगले उत्पादन होऊ शकते. यंदाचा आंब्याचा मोसम पूर्णपणे नुकसानी जाणार अशा प्रकारचा अंदाज आंबा उत्पादकांनी व्यक्त केला होता. कारण हवामानामध्ये उष्णता निर्माण झाली होती. यामुळे सत्तरी तालुक्यातील आंब्याना चांगल्या प्रकारचे पीक येणार नाहीत अशी शेतक्रयांचा अंदाज होता. मात्र गेल्या चार दिवसापासून थंडीच्या वातावरण निर्माण होऊ लागले आहे. यामुळे अशा प्रकारच्या वातावरण आंब्या उत्पादनासाठी अत्यंत चांगल्या स्वरूपाचे आहे. यातून आंबा उत्पादनात चांगल्या प्रकारचा मोहोर येऊन त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळू शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या दीड महिन्याच्या काळात थंडीचा जोर एकदमच मंदावला होता. त्यामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता दाट होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून चांगल्या प्रकारची थंडी पडत आहे. याचा सकारात्मक परिणाम आंबा पिकावर होईल, अशी प्रतिक्रिया नगरगाव येथील आंबा उत्पादक जयेश गावकर यांनी दिली. केरी येथील रामदेव गवस यांनी आंबा उत्पादनाला वातावरण अत्यंत चांगले असल्याचे सांगितले. आंबे चांगल्या प्रकारे जरी मोहरलेअसले तरी आणखी काही दिवस वातावरणात गारवा असणे आवश्यक आहे. जास्त उष्णता निर्माण झाल्यास त्याचे दुष्परिणाम सुद्धा आंब्याच्या मोहरावर होऊन आंबा उत्पादनाला फटका बसण्याची भीती यावेळी कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी व्यक्त केली.









