वृत्तसंस्था/ लंडन
पुढील वर्षी येथे होणाऱ्या लंडन मॅरेथॉनमध्ये जगभरातून 11 लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले असल्याची माहिती या स्पर्धेचे सीईओ ह्यू ब्रेशर यांनी दिली
या मॅरेथॉनसाठी 11,33,813 पुरुष व महिला धावपटूंनी अर्ज पाठविले आहेत. यामध्ये यजमान ब्रिटनमधील 8,70000 धावपटूंचे अर्ज आहेत. याशिवाय इतर देशांतून 2,64000 खेळाडूंचे अर्ज दाखल झाले आहेत. मागील वर्षीच्या मॅरेथॉनवेळी 8,40,318 धावपटूंनी अर्ज दाखल करून विक्रम केला होता. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी हा विक्रम मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 1981 मध्ये सुरू झालेल्या या मॅरेथॉनवेळी 7000 धावपटूंनी भाग घेतला.









